‘न्यूड’ झळकणार ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ओपनिंगला

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा बहुमान मिळाल्याचे जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. ओपनिंग सिनेमाचा मान मिळवणारा ‘न्यूड’ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.

इंडो अमेरिकन आर्ट काऊन्सिलचा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 7 ते 12 मे या कालावधीत पार पडणार आहे. रवी जाधव यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. गेल्या वर्षी गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून हा चित्रपट ऐनवेळी वगळण्यात आला होता. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून न्यूड वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. विशेष म्हणजे, परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी या निर्णयावर टीका केली होती. मात्र न्यूड या सिनेमाने रिलीजआधीच साऱ्यांची मनं जिंकण्यास सुरुवात केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)