न्यूट्रीयंटस’च्या साखरचे ट्रक शेतकऱ्यांनी रोखले

कोल्हापूर – दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून जिल्हा बँकेच्या आदेशाने विक्री करण्यात आलेली साखरेचे पाच ट्रक जनआंदोलन कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दौलतच्या कामगारांनी रोखले. यासंदर्भात आज दौलत कार्यस्थळावर चंदगड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे.दौलत साखर कारखाना चालवायला घेतलेल्या न्यूट्रियंटस कंपनीने मागील हंगामातील शेतकरी व तोडणी-ओढणी कामगारांची बिले दिलेली नाहीत. कामगारांचे पगार दिलेले नाहीत.

जिल्हा बँकेचे गोडावूनातील साखरेवर तारण कर्ज असून या साखरेच्या विक्रीचे टेंडर काढण्यात आले होते. बाजारात सरासरी 2900 रूपये क्विंटलचा दर असताना ही साखर 2400 रुपये क्विंटल दराने विकण्यात आली आहे. साखर भरण्यासाठी दौलत कार्यस्थळावर आज पाच ट्रक आले. त्या यामध्ये 1160 क्विंटल साखर भरण्यात आली होती. हे ट्रक संघटनामार्फत रोखण्यात आले. शेतकरयांचे बिल दिल्याशिवाय साखर विक्री करू दिली जाणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. आंदोलनाता प्रा. दीपक पाटील, विष्णू गावडे, पांडुरंग बेनके, विलास थोरवत, राजेंद्र पावसकर, अर्जुन होडगे, गोपाळ गावडे, विश्वनाथ पाटील, राजू पाटील आदींचा सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)