न्यूज चॅनल सीएनएनने ठोकला अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यावर दावा 

वॉशिंग्टन (अमेरिका) – सीएनएन या न्यूज चॅनलने अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस व्यवस्थापन यांच्यावर दावा ठोकला आहे. सीएनएनचा पत्रकार जिम ऍकोस्टा याचा व्हाईट हाऊस मधील प्रवेशासाठीचा रद्द केलेला पास पुन्हा चालू करावा यासाठी हा दावा ठोकण्यात आलेला आहे. 7 तारखेला एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि जिम ऍकोस्टा यांच्यात जोरदार शब्दाशब्दी झाली होती.

जिम ऍकॉस्टाने लॅटिन अमेरिकेतून अमेरिकेच्या दक्षिण सीमेकडे येणाऱ्या स्थलांतरितांसंबंधी ट्रम्प यांना प्रश्‍न विचारला होता. त्याच संदर्भात जिम ऍकॉस्टा आणखी प्रश्‍न विचारण्याच्या तयारीत असताना ट्रम्प यांनी आता पुरे म्हणून त्यांना थांबवले होते. त्याच वेळी व्हाईट हाऊसच्या एका मदतनीसाने ऍकॉस्टा यांच्या हातातील माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला.

-Ads-

जिम ऍकॉस्टा यांचा पास रद्द करून सीएनएन आणि जिम ऍकॉस्टा यांच्या माध्यम स्वातंत्र्याच्या हक्कावर अतिक्रमण केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सीएनएनच्या अन्य डझनावारी पत्रकारांकडे व्हाईट हाऊसचे पास आहेत. जर पत्रकार अशा प्रकारे वर्तणूक करणार असतील तर व्हाईट हाऊसला व्यवस्थित आणि शिस्तशीर पत्रकार परिषद घेणे शक्‍य होणार नाही. या दाव्याचे आम्ही जोरदार खंडन करू असे व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्स यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)