न्युयॉर्कमध्ये ड्रग्जच्या नशेतील कारचालकाने 23 जणांना चिरडले

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर एका कार चालकाने अनेक लोकांना चिरडल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. या अपघातात एलिसा एल्समन नावाच्या 18 वर्षीच मुलीचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
टाइम्स स्क्वेअरवर गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. 26 वर्षीय बडतर्फ लष्करी जवान रिचर्ड रोजासने नशेच्या अंमलात भरधाव कार पादचाऱ्यांच्या अंगावर चढवली. अपघात झाला त्यावेळी कारचा वेग 120 किमी प्रति तासपेक्षा जास्त होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी रिचर्ड रोजास हा ब्रॉन्क्‍सचा रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रिचर्डने ड्रग्जच्या नशेत आपली कार फूटपाथवर चढवली आणि त्यानंतर कार पोलला जाऊन धडकली. टाइम्स स्क्वेअरवर कायमच वर्दळ असते. अपघाताच्या वेळी कारचा वेग 120 किमी प्रति तासपेक्षा जास्त होता. अपघातानंतर रिचर्डने पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. पोलिस कोठडीत येताच मला या सगळ्यांना मारायचे होते, असे रिचर्ड रोजास जोरजोरत ओरडू लागला. रिचर्डवर खून आणि 20 जणांच्या हत्येचा प्रयत्नासह अनेक आरोपांखाली खटला चालवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, त्याच्या या कृत्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण या घटनेमागे अतिरेकी हात असल्याचे कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत, असे शहराचे महापौर बिल डे बलसियो यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)