न्या. सिक्री यांनी नाकारली केंद्राची ऑफर

नवी दिल्ली – “सीबीआय’चे प्रमुख आलोक वर्मा यांना हटवण्याचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेल्या न्या. ए.के.सिक्री यांनी निवृत्तीनंतरच्या सेवेबाबतची केंद्र सरकारची आकर्षक ऑफर नाकारली आहे. निवृत्तीनंतर लंडनमधील राष्ट्रकुल सचिवालयातील लवाद (कॉमनवेल्थ सेक्रेटरीएट आर्बिट्रल ट्रिब्युनल) चे सदस्य किंवा अध्यक्षपदासाठी केंद्र सरकारकडून न्य. सिक्री यांचे नामांकन करण्यात आले होते. मात्र न्या. सिक्री यांनी केंद्राची ही ऑफर नाकारली असल्याचे समजते आहे.

आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधिकार बहाल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीमध्ये वर्मा यांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये लोकसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश होता. या समितीमध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे प्रतिनिधी म्हणून न्या. सिक्री हे या बैठकीत उपस्थित होते. त्यांच्या मतामुळे आलोक वर्मा यांना हटवण्यात आल्याची टीका व्हायला लागली होती. त्यामुळे आपण व्यथित झालो असल्याचे न्या. सिक्री यांनी विधी आणि सचिवांना पत्र लिहून कळवले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)