न्या. सिक्री यांचीही सुनावणीतून माघार 

नवी दिल्ली – न्यायमूर्ती ए के सिक्री यांनी स्वत:ला एम नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीविरोधी याचिकेच्या सुनावणीतून अलग केले आहे. केंद्र सरकारने एम नागेश्‍वर राव यांची सीबीआयचे अंतरिम प्रमुखपदी नियुक्ती केली होती. या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोगोई यांनी नवीन सीबीआय निवड समितेचे सदस्य असल्याने अगोदरच या याचिकेच्या सुनावणीतून स्वत:ला अलग केले आहे.

10 जानेवारी रोजी आलोक वर्मा यांना सीबीआय प्रमुखपदावरून वादग्रस्त पद्धतीने दूर करणाऱ्या उच्चस्तरीय समितीत न्या. सिक्री यांनी मुख्य न्यायाधीश गोगोई यांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनीही राव यांच्या नियुक्तीला आव्हान देण्याऱ्या याचिकेच्या सुनावणीतून स्वत:ला अलग केले आहे. माझी मनोभूमिका (position) स्पष्ट आहे. मी या याचिकेची सुनावणी करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे सारे निराशाजनक होत चालले आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाकर्त्या कॉमन कॉज या एनजीओचे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी दिली आहे. असे दिसते, की ते या केसची सुनावणी करू इच्छित नाहीत. यापूर्वी मुख्य न्यायाधीशांनीही या केसपासून स्वत:ला अलग केले होते. न्यायालय मूक आहे, सरकार मूक आहे, कोणीही काहीही बोलायला तयार नाही. परिस्थिती खरोखरच निराशाजनक होऊ लागली आहे. न्यायमूर्ती सिक्री, एस अब्दुल नझीर आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की ही याचिका पुढील आठवड्यात सुनावणीसाठी येणाऱ्या याचिकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. सदर खंडपीठात आमच्यापैकी एक न्यायाधीश असणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)