न्या. लोया मृत्यू प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार

नवी दिल्ली : न्यायमुर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी विविध याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

न्या. लोया यांचा मृत्यू १ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. मात्र, हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आलाय. मृत्यूमागे घातपाताची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणावर ते सुनावणी करीत होते. या प्रकरणात भाजपाचे सध्याचे अध्यक्ष अमित शहा हे आरोपी होते त्यांना आता आरोपमुक्त करण्यात आले आहे.

लोया यांच्या मृत्यूप्रकरणाच्या स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी विविध याचिकांद्वारे सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. या याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करुन घेतल्या असून सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर १६ मार्च रोजी आल्या होत्या. मात्र, त्यावर खंडपीठाने आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र, आज या याचिकांवर निकाल येण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)