न्या. नरेश पाटील यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ 

मुंबई – उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून न्या. नरेश हरिश्‍चंद्र पाटील यांनी शपथ घेतली. राजभवन येथे सोमवारी झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी न्या. पाटील यांना पदाची शपथ दिली.

शपथविधीला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, निवृत्त मुख्य न्यायाधीश मोहित शाह व न्या. जे.एन. पटेल तसेच न्या. नरेश पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते. दिनांक 12 ऑगस्ट 2018 रोजी न्या. पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)