न्या. कर्नान यांची याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली – न्या, कर्नान यांची याचिका स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाने (रजिस्ट्री)नकार दिला आहे. न्यायालयाची अवमानना केल्याबद्दल सहा महिने तुरुंगवासाची दिलेली शिक्षा रद्द करण्यात यावी यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्या.कर्नान यांनी याचिका दाखल केली होती. सदर याचिका दखल घेण्यायोग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील 7 न्यायाधींशांच्या खंडपीठाने 9 मे रोजी न्या. कर्नान यांना दोषी ठरवून 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि त्यांना ताबडतोब ताब्यात घ्यावे असा आदेश पश्‍चिम बंगाल पोलीसांना दिला होता. हा निकाल रद्द करावा यासाठी न्या. कर्नान यांनी आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. कर्नान यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)