न्यायालय परिसरात कुख्यात गॅंगस्टार संतोष झाची हत्या

सीतामढी – बिहार राज्यातील कुख्यात गॅंगस्टार संतोष झा याची सीतामढी न्यायालय परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संतोष झा याला आज सुनावणीसाठी हजर करण्यात येत असताना अज्ञातधारकांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. यात आणखी एक जण जखमी झाला असून एकास अटक करण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुहेरी हत्याकांडप्रकरणी संतोष झा याची आज सीतामढी न्यायालयात सुनावणी होती. त्याला न्यायालयात हजर करून सुनावणी सुरू असतानाच मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कक्षात काही हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी डोक्‍यात आणि दुसरी गोळी छातीत लागल्याने संतोष झा जागीच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यात आणखी एक न्यायालयीन कर्मचारी जखमी झाला आहे. या गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पोलीस निरिक्षक विकास बर्मन म्हणाले, हा गोळीबार तीन-चार हल्लेखोरांनी केला असण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर न्यायालयीन परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, दरभंगा येथील दोन इंजिनिअरची हत्या केल्याप्रकरणी संतोष झा आणि मुकेश पाठकसहित दहा दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर अन्य चार जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)