न्यायालय इमारतीसंदर्भात मुंबईत बैठक

पिंपरी – मोशी, बोऱ्हाडेवस्ती येथील पेठ क्रमांक 14 मध्ये प्रस्तावित जिल्हास्तरीय न्यायालय इमारतीच्या हालचालींना वेग आला असून राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज (गुरुवारी) सकाळी साडे अकरा मंत्रालय येथे बैठक आयोजित केली आहे.

नियमांनुसार 10 ते 15 हजार लोकसंख्येसाठी एक न्यायालय असणे अपेक्षित आहे. शहराची लोकसंख्या वीस लाखांहून अधिक झाली आहे. शहराची लोकसंख्या वीस लाखाच्या घरात गेली आहे. तेथे पाच न्यायाधीशांमार्फत काम सुरू आहे. तो विचार करून मोशी येथील सुमारे 15 एकर जागेवार प्रशस्त जिल्हास्तरीय न्यायालय उभारण्यात येणार आहे. त्यानुसार न्यायालयासाठी 2012 मध्ये ही जागा ताब्यात घेण्यात आली. त्यानुसार शासनाकडून निधी मंजूर झाला होता. त्यानंतर त्या जागेवर काम सुरू केले. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्व वकिलांना होती. मात्र, त्यानंतर ते काम सरकारी अनास्थामुळे रखडले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोरवाडी न्यायालय महापालिकेच्या जागेवर 25 वर्षांपासून अधिक काळ भाडेतत्वावर सुरू आहे. न्यायालयाची स्थापना 8 मार्च 1989 मध्ये झाली. तेव्हापासून या न्यायालयात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी स्तरावरील पाच न्यायाधीशांमार्फत कामकाज चालते. शहराची लोकसंख्या विचार घेता, या ठिकाणी जिल्हास्तरीय जागेची मागणी जोर धरू लागली आहे.

शहराची वाढती लोकसंख्या तसेच, पोलीस ठाण्याच्या विस्तारही वाढत गेला आहे. त्यामानाने मोरवाडी न्यायालयावर अतिरीक्त ताण येत आहे. तसेच, कामगार, कौटुंबिक न्यायालय पुणे येथे असल्याने न्याय मिळण्यासाठी अशिलांना तेथे जावे लागते. पर्यायाने त्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वतंत्र न्यायालय होण्याची मागणी आहे. दुसरीकडे न्यायालयात लाखो खटले प्रलंबित आहेत. बसण्यासाठी अपुरी जागा, वाहनतळाची गैरसोय, अपुरे मनुष्यबळ अशा अनेक अडचणी सध्या निर्माण झाल्या आहेत. हे न्यायालय लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशन व आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार उद्या मंत्रालयात बैठक होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)