न्यायालयीन वेळेत मोबाईलवर टाईमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करू

अद्याप कर्मचाऱ्यांविरोधात कोणाचीही तक्रार नाही
तक्रार आल्यावर कारवाई करू : जिल्हा न्यायालय प्रशासन
पुणे, दि. 31 (प्रतिनिधी) – शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात कार्यालयीन वेळेत कर्मचारी सातत्याने मोबईलवर बोलताना अथवा व्हॉटसअप, फेसबुकवर टाइमपास करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र, अशा प्रकारच्या अधिकृत तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयासाठी नाशिक जिल्हा प्रमुख न्यायाधीशांनी सातत्याने फोनवर आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे परिपत्र काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील काय परिस्थिती आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास काय कारवाई केली जाते. त्याबाबत काही निर्देश आहेत का, याची विचारणा शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाचे न्यायालयीन व्यवस्थापक अतुल झेंडे यांच्याकडे करण्यात आली. त्यावेळी झेंडे म्हणाले, शिवाजीनगर न्यायालयात कर्मचारी मोबाईलवर टाईमपास करत असल्यासंबंधीच्या तक्रारी अद्याप न्यायालय प्रशासनाकडे आलेल्या नाहीत. मात्र, भविष्यात कर्मचाऱ्यांबाबत अशा तक्रारी आल्यास कारवाई करू. मात्र, सध्या तरी अशा प्रकारचे कोणतेही परिपत्रक किंवा निर्देश देण्यात आलेले नाहीत. गरज वाटल्यास प्रमुख न्यायाधीशांशी चर्चा करुन अशा प्रकारचे निर्देश देण्यात येऊ शकतात.
दरम्यान नाशिकसाठी नुकतेच हे परिपत्रक काढण्यात आले आहे. कार्यालयीन वेळेत न्यायालयीन कर्मचारी मोबाईलवर बराच वेळ बोलत असतात. तसेच व्हॉटसअप आणि फेसबुकवर चॅटींग करत असतात. त्यामुळे सरकारी कामात खोळंबा निर्माण होतो. तसेच पीठासीन अधिकारी न्यायासनावर गेल्यावर त्यांच्या न्यायालयातील शिपाई, कर्मचारी बाहेर स्टुलवर चॅटींग करतात. पक्षकारांना न्यायालयात मोबाईल वापरण्यास मनाई आहे. मात्र, त्यांच्यासमोर कर्मचारी मोबाईल वापरतात. ही बाब कार्यालयीन शिस्तीचे उल्लघंन करणार आहे. शिवाजीनगर न्यायालयात कर्मचारी सातत्याने मोबाईलवर बोलत, व्हॉट्‌सअप अथवा फेसबुकवर चॅटींग करत असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करू, असे झेंडे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)