न्यायालयीन निकाल आणि राजकारण (भाग-२)

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर होत असलेली लोकसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर भारताच्या राजकारणात दोन धार्मिक मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशीद विवादावर 29 ऑक्‍टोबरपासून सुनावणी सुरू होणार असून, लोकसभा निवडणुकीपर्यंत ती टाळण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर यासंदर्भात कायदा करण्याची मागणी पुढे आली आहे. दुसरीकडे, शबरीमाला मंदिर प्रवेशप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही तणावाचे वातावरण असून, फेरविचार याचिका दाखल झाली आहे.

न्यायालयीन निकाल आणि राजकारण (भाग-१)

राम जन्मभूमी-बाबरी मशीद विवादावर सुनावणी सुरू होण्याच्या आधीच शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. न्यायालयाने सर्वच वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाची अनुमती दिली. या निकालानंतर भगवान अय्यप्पा यांच्या अनुयायांकडून कडवा विरोध झाल्यामुळे केरळमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी संविधान पीठाच्या निकालावर फेरविचार करण्यासाठी याचिकाही दाखल करण्यात आली आणि त्यावर खुल्या न्यायालयातच सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली; परंतु सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 9 ऑक्‍टोबर रोजी फेरविचार याचिकेवर जलद सुनावणी करण्यास नकार दिला आणि त्यावर चेंबरमध्येच फेरविचार करण्यात येईल, असे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, दसरा मेळाव्यात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शबरीमाला मंदिर प्रकरणाचा उल्लेख करून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या व्यवस्थेवर टीका केली. तसेच राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा केला जावा अशीही मागणी केली. भाजपने या मागणीचे समर्थन केले, यावरूनच असे दिसून येते की, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भागवत आणि भाजपच्या सुरात सूर मिसळून राम मंदिरासाठी कायदा आता केला नाही तर कधीच होणार नाही, अशी भूमिका घेतली.

सध्या भारतीय राजकारणात हे दोन धार्मिक मुद्दे पुढे आणले जात आहेत. राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा धार्मिक विषयच येत आहेत. शबरीमाला मंदिराविषयी घटनापीठाने दिलेल्या निकालावर चेंबरमध्ये फेरविचार कधी होतो आणि अंतिम निकाल काय लागतो, हे पाहावे लागणार आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा मुद्दाही खूपच महत्त्वपूर्ण आहे. सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन मालकीवरून हक्क सांगणाऱ्या अपिलांवरील सुनावणी नियमित सुरू होणार का, हा सध्याचा कळीचा प्रश्‍न आहे.

– अॅड. प्रदीप उमाप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)