न्यायालयीन दाव्यांसाठी कायदेशीर सल्लागार

देहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड कॅन्टोन्मेंट संबंधित न्यायालयीन दाव्यांसाठी कायदेशीर सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावास कॅन्टोन्मेंट बोर्डाने मान्यता दिली. यासाठी खर्चाचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षात कॅन्टोन्मेंट शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा ठरलेल्या वेळेत न केल्याबद्दल संबंधित ठेकेदाराकडून दहा पट दंड त्यांच्या सुरक्षा रकमेतून वजा करणे, कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुधारित दराप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, भांडारासाठी लागणाऱ्या विविध साहित्यांचा निविदास मंजुरी देण्यात आली. कॅन्टोन्मेंट मिळकती व शाळा सुरक्षा आणि मनुष्यबळ पुरवठा या निविदा पुन्हा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्टोन्मेंटने भाड्याने दिलेल्या मिळकती, त्यांचे निश्‍चित केलेले दरमहा भाडे, वसूल आणि थकीत भाडे याची सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना अध्यक्षांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)