न्यायालयाच्या अॅट्रॉसिटी निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करा-कॉंग्रेस

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात आता विरोधी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारण, अॅट्रॉसिटीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच या प्रश्नावरून सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेसने आज संसद भवन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी दलितोंके हित मे राहुल गांधी मैदान मै अशा घोषणाही काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्या.

अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) तक्रारीची सखोल चौकशी केल्याशिवाय यापुढे कोणाहीविरुद्ध गुन्हा नोंदवता येणार नाही. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा नोंदवला तरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी संमतीखेरीज आरोपीस अटकही करता येणार नाही, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला होता. याच निर्णयाला आज कॉंग्रेसने संसद भवन परिसरात कडाडून विरोध केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)