न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला शिक्षा

मुंबई – फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या साईटवर उच्च न्यायालय आणि महिला न्यायमूर्तींबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर याला दोषी ठरवून तीन महिन्याची कैद आणि दोन हजार रूपयाचा दंड ठोठावला.

न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती सत्यरंजन घर्माधिकारी, आर.एम. सावंत यांच्या त्रिसदस्य पूर्ण पिठाने हा निर्णय देताना तिरोडकर याला या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी म्हणून सहा आठवड्याची स्थगिती दिली. तर या प्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलने दहा महिन्यापूर्वी अटक केलेल्या तिरोडकरला न्यायालयाने दिलासा देत न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी 15 हजार रूपयाच्या सशर्त जामीनावर सुटका केली.

-Ads-

मराठा आरक्षण, आदर्श घोटाळा, दाभोलकर-पानसरे हत्याकांड, 26/11 चा दहशतवादी हल्ला, सरकारी आरक्षणातून मिळणारी घरे, न्यायाधीशांच्या घरांसाठी आरक्षित भूखंड अशा अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर तिरोडकरने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. माहितीच्या आधारे भ्रष्टाचार आणि अनेक गैरप्रकारांना वाचा फोडली. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींविरोधात फेस बुकवर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यास सुरूवात केली. या प्रकरणी न्यायालयाने स्वत: दखल घेऊन तिरोडकर याच्या विरोधात अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावून या प्रकरणासाठी यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, आर.एम. सावंत यांच्या त्रिसदस्य पूर्ण पिठाची स्थापना केली. या पूर्णपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर आज निर्णय जाहिर करताना तिरोडकर याला दोषी ठरवून तीन महिने कारावास आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)