न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार

चंदिगढ – बलात्काराच्या आरोपामध्ये दोषी आढळलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये हिंसाचार उसळण्याची शक्‍यता आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यालाच पोलिसांचे प्राधान्य असेल, असे हरियाणाचे पोलिस महासंचालक बी.एस. संधू यांनी सांगितले. बलात्कार प्रकरणातील दोषी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावण्यासाठी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत.

राम रहीमला सोमवारी कोर्टात नेण्याऐवजी न्यायाधीशच आता तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत. शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिक्षेच्या सुनावणीसाठी रोहतक तुरुंगातच सोमवारी कोर्ट रुम तयार करण्यात येणार आहे. सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांना हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात आणले जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)