न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी वकिलाला कारावास

पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला
औरंगाबाद – न्यायालयाचा अवमान आणि न्यायाधीशांना धमकी दिल्याप्रकरणी परभणीतील ऍड. रामचंद्र कांगणेला एका आठवड्याची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावली आहे. या प्रकरणाचा निकाल तब्बल 13 वर्षांनी लागला आहे.

परभणीच्या न्यायमूर्ती बिलोलीकर यांच्या कोर्टात 2005 मध्ये बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आरोपीकडून ऍड. रामचंद्र कांगणे, तर सरकारी पक्षाकडून ऍड. रमेश शर्मा बाजू मांडत होते. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती बिलोलीकर निकाल देत असताना, कांगणे यांनी न्यायालयात गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच स्टेनों वही हवेत भिरकावून लावली. न्यायालयाचा अवमान करत न्यायमूर्तींना धमकीही दिली.

या प्रकरणाची दखल घेऊन कांगणेंविरोधात न्यायालयाचा अवमान आणि धमकावल्याची तक्रार दिली. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात सुनावणीसाठी गेले होते. तब्बल तेरा वर्षानंतर हे प्रकरण निकाली लागले असून ऍड. कांगणे दोषी ठरले आहेत. त्यांना एका आठवड्याची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णय दिल्यानंतर ऍड. रामचंद्र कांगणे यांना लगेच अटक करण्यात आली असून त्यांची रवनागी औरंगाबाद कारागृहात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)