न्याययंत्रणा – सरकारमधील सलगी लोकशाहीसाठी मृत्यूघंटा

न्या.चेलमेश्‍वर यांचे सरन्यायाधीशांना पत्र
नवी दिल्ली – सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी एकप्रकारे बंडाचे निशाण फडकावणारे सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश जे.चेलमेश्‍वर यांनी पुन्हा अभूतपूर्व पाऊल उचलताना सरन्यायाधीशांना पत्र पाठवले आहे. न्याययंत्रणा आणि सरकारमधील सलगी लोकशाहीसाठी मृत्यूघंटा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, कार्यकारिणीच्या न्याययंत्रणेमधील कथित हस्तक्षेपाच्या मुद्‌द्‌यावर विचार करण्यासाठी पूर्ण पीठ बोलावण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

न्या. चेलमेश्‍वर यांनी सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्राच्या प्रती सर्वोच्च न्यायालयाच्या इतर 22 न्यायाधीशांनाही पाठवण्यात आल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिनेश माहेश्‍वरी यांनी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कृष्णा भट यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या विनंतीवरून हे पाऊल उचलण्यात आल्याविषयी पत्रात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

पदोन्नतीसाठी भट यांच्या नावाची शिफारस कॉलेजियमने दोनवेळा केल्यानंतरही त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याबद्दल आणि कार्यकारिणीने थेट मुख्य न्यायाधीशांशी संपर्क साधल्याबद्दल न्या.चेलमेश्‍वर यांनी चिंता व्यक्त केली आहे. एक महिला न्यायअधिकाऱ्याने भट यांच्यावर विशिष्ट आरोप केले होते. त्याची चौकशी करण्याचा आदेश 2016 मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश टी.एस.ठाकूर यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश एस.के.मुखर्जी यांना दिला होता. चौकशीनंतर भट यांना क्‍लीन चिट देण्यात आली. त्यामुळे भट यांच्या नावाची शिफारस पदोन्नतीसाठी करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)