न्यायमूर्ती रंजन गोगाई नवे सरन्यायाधीश : जाणून घ्या त्यांच्याबद्दल 

नवी दिल्ली – न्या. रंजन गोगाई यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ ग्रहण केली. मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी रंजन गोगाई यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोहोर लावली. यानंतर आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात रामनाथ कोविंद यांनी गोगाई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगाई यांचा कार्यकाळ एकूण १३ महिन्यांचाच म्हणजेच नोव्हेंबर २०१९ पर्यंत असणार आहे.

 कोण आहेत न्या. रंजन गोगाई – 
– न्या. रंजन गोगाई हे सरन्यायाधीश या पदावर बसणारे पूर्व भारतातील पहिलेच व्यक्ती आहेत.
–  न्या. गोगई हे माजी मुख्यमंत्री केशव चंद्र गोगाई यांचे सुपुत्र आहेत.
– १९७८ साली गुवाहाटीतून वकिली सुरु करणारे न्या. रंजन गोगाई २००१ साली गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
– व २०१२ साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
– न्या. गोगाई यांनी अनेक महत्वपूर्ण प्रकरणांमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.
– आसाममधील एनआरसी, राजीव गांधी हत्येप्रकरणातील आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेत कमी करणे, लोकपाल नियुक्ती, सौम्या हत्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्केंडेय काटजू यांना नोटीस जारी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)