न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ

नवी दिल्ली – सरन्यायाधीश खेहर यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश अशी ओळख असलेले न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांनी आज सरन्याधीश म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश जे. एस. खेहर हे 27 ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्यानंतर आज भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी शपथ घेतली. न्यायमूर्ती मिश्रा यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली.

ओरिसामधून सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती मिश्रा तिसरे व्यक्‍ती आहेत. त्यांच्यापूर्वी न्या. रंगनाथ मिश्रा आणि न्या. जी. बी. पटनाईक यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा कार्यकाल 02 आक्‍टोबर 2018 पर्यंत असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)