पिंपरी – नौदलात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणाची पावणेपाच लाखांची फसणूक करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुजय संजय घनवट (वय-21, रा. गारमळा कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश अण्णा थोरात, नितीन अण्णा थोरात, संगीत अण्णा थोरात (सर्व रा. मोरगाव, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी घनवट यांना नौदलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी 4 लाख 74 हजार 554 रुपये घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपी टाळाटाळ करीत असल्याने घनवट यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0