नौदलाचे व्हाइस अॅडमिरल मनोहर आवटी यांचे निधन

फलटण – नौदलाचे व्हाइस अॅडमिरल एम. पी. आवटी यांचे निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. आवटी यांचे रविवारी मध्यरात्री फलटणजवळील विंचुर्णी या मूळगावी निधन झाले. जिंदादिल व्यक्तिमत्व असलेल्या आवटी यांच्या निधनाने नौदलातील एका महान पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आयएनएस कमोर्टा’ या युद्धनौकेवरील मुख्य अधिकारी म्हणून मनोहर आवटी यांना 1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या बांग्लादेश मुक्ती युद्धातील नेतृत्त्व आणि शौर्याबद्दल वीर चक्राने सन्मानीत करण्यात आले होते. तसेच त्यांना नौदलातील अतुलनिय सेवेबद्दल आजवर परम विशिष्ट सेवा पदक, संग्राम पदक, रक्षा पदक यांसह विविध सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. भारताला दर्यावर्दींची एवढी परंपरा असूनही आपल्यापैकी कुणीही विश्व सागर परिक्रमा केलेली नाही, याचं शल्य त्यांना वाटायचं आणि त्यामुळे नौदलाने या साहसी उपक्रमात उतरावं, याचा पाठपुरावा ते सतत नौदलप्रमुखांना पत्रं लिहून करत होते. अॅडमिरल आवटी यांच्या आग्रहामुळे सन 2010 साली पृथ्वीला जलप्रदक्षिणा घालणारा पहिला भारतीय होण्याचा मान कमांडर दिलीप दोंदे या मराठी नौदल अधिकाऱ्यांना मिळाला. या यशामागे अॅडमिरल आवटी यांचीच प्रेरणा होती. अॅडमिरल आवटी आजही नौसैनिकांना नेहमीच मार्गदर्शन करत असून नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा धाडसी विरांगनांनी शिडाच्या नौकेतून अलिबाग येथून सागर प्रदक्षिणेला सुरुवात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गतवर्षी त्यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर उपचारासाठी भारतीय नौदलाच्या खास हेलीकॉप्टरने (हवाई रुग्णवाहिका) येथील विमानतळावरुन मुंबईच्या नौदलाच्या “अश्विन’ रुग्णालयात नेण्यात होते. फलटण येथून अशाप्रकारे खास हेलीकॉप्टरने रुग्णाला पाठविण्याची ही पहिलीच वेळ होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)