नौटंकीबाजांना हरवण्यासाठी परिवर्तन गरजेचे ; जयंत पाटलांचा भाजप-सेनेला टोला !

रायगड:  महाड येथे चवदार तळ्याचे घेऊन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्चन यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा आरंभ झाला. महाड य़ेथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सरकारविरोधात टीकेची तोफ डागत आता परिवर्तन होणारच हा नारा दिला.

भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? हा प्रश्न समाजातील सर्वच स्तरातील लोक आता विचारत आहेत. लोक प्रश्न विचारतील, निषेध करतील म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांच्यावेळी लोकांना तुरूंगात डांबले जात आहे. धर्माबाबाच्या पत्नीची मुख्यमंत्र्यांना काय भीती होती. त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले? असा सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारला.

यावेळी जयंत पाटील यांनी युतीतील शिवसेनेवर देखील टीका केली. भाजपा अध्यक्ष अमित शाह “शिवसेना को हम पटक देंगे़” असे म्हणाले. स्व. बाळासाहेब ठाकरे आज असते तर काय हाल झाले असते अमित शाहंचे..? शिवसेना भाजपमध्ये इतके मतभेद असतील तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना का भेटायला गेले होते? असा प्रश्न करत या नौटंकीबाजांना हरवण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)