“नो हॉर्न डे’ योग्यच; पण, शांतता क्षेत्रांचे काय?

– गणेश राख

पुणे – हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. यावर जनजागृतीसाठी “नो हॉर्न डे’ च्या माध्यमातून सामूहिक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील शांतता क्षेत्रांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. शहरात गेल्या वर्षी ही संख्या 2 हजार 14 होती. मात्र, आता फक्‍त 121 एवढेच शांतता क्षेत्र ठरविण्यात आली आहेत. “नीरि’ अर्थात नॅशनल एन्व्हॉरर्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार शहरातील विविध भागात मर्यादेपेक्षा अधिक ध्वनीप्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे.

पुण्यात वाढत्या वाहनसंख्येसोबतच पर्यावरणविघातक समस्यांनी तोंड काढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी “नो हॉर्न डे’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशासन आणि विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन जनजागृती केली जाणार आहे. शांतता क्षेत्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, शहरातील शांतता क्षेत्रांची महापालिकेने नुकतीच यादी तयार केली. त्यात शहरात अवघी 121 शांतता क्षेत्रे ठरविण्यात आली आहेत. यातून तब्बल 1 हजार 916 शांतता क्षेत्र वगळण्यात आली आहेत. नव्या ठिकाणांमध्येही मोजकीच प्रमुख रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरात ही ठिकाणी निश्‍चित केली आहेत. दरम्यान, “नीरि’च्या अहवालानुसार, औद्यागिक, व्यावयासिक, निवासी आणि शांतता क्षेत्रात मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीप्रदूषण होत आहे. ही आकडेवारी ही धक्कादायक आहे. ऐन उत्सवांच्या काळात कमी झालेली शांतता क्षेत्रे चिंताजनक असून यामुळे प्रदूषणामध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे शांतता क्षेत्रे ही फक्त नावापुरतीच ठरणार आहेत.

शांतता क्षेत्र केवळ फलकावरच –
शहरातील शांतता क्षेत्र फक्‍त फलकावरच आहेत. शहरात 37 लाख खासगी वाहने असून अरूंद रस्ते, अतिक्रमणांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली जात आहे. शहराच्या सर्व भागात वाहनांच्या आवाजाची मर्यादा ही 75 डेसीबलच्या वर आहे. तर उत्सव काळात ही आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी पाहता शांतता क्षेत्र घोषित केल्यानंतरही ती फलकांपुरतीच मर्यादित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)