नो फोटोज प्लिज!

सोशल मीडिया म्हणजे म्हणजे एका क्षणात कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचण्याचे माध्यम. स्वतंत्रपणे अभिव्यक्त होण्याचे माध्यम. सेलिब्रिटीज आपल्या लाखो चाहत्यांना क्षणाक्षणाचे अपडेट देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत असतात. परंतु, नुकतेच दीपिका आणि रणवीरचे लग्न हा ट्रेंड बदलू पाहत आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी आपला लग्न सोहळा ‘प्रायव्हेट’ ठेवण्याचा निर्णय घेतला. या लग्नापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले होते. तसेच लग्नतील उपस्थित पाहुण्यांनाही कोणतेही फोटो सोशल मीडियावर टाकण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे दीपवीरचे लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते चांगलेच आसुसले होते. यामुळे त्यांच्या फोटो प्रसिद्ध न करण्यामागे अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. फोटोंचे मीम्स बनवले जातील यासाठी नाही प्रसिद्ध केले वैगरे वैगरे. परंतु, यामागील महत्वाचे कारण म्हणजे दीपिका-रणवीर आपल्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव करणार असून यातून मिळालेले पैसे ते ‘दी लिव्ह लव्ह लाफ’ या संस्थेला देणगी म्हणून देणार आहेत. केवळ दीपिका आणि रणवीरचा नव्हे तर प्रियंका चोप्रा आणि निक जोनसनेही आपल्या लग्नाच्या फोटोंचे सर्व हक्क एका मासिकाला विकले आहेत. यामुळे प्रियंका चोप्राला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. याव्यतिरिक्तही अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी आपल्या विवाहाच्या फोटोंचे हक्क विकून कोट्यवधी कमावले आहेत.

कोणत्याही सेलिब्रिटींचे लग्न असेल तर माध्यमांसह त्यांच्या चाहता वर्गालाही मोठी उत्सूकता असते. परंतु, आजकाल सेलिब्रिटी आपल्या विवाहापासून प्रसारमाध्यमांना आणि सोशल मीडियाला चार हात जरा लांबच ठेवत आहेत. प्रत्येकाची सोशलसोबत वैयक्तिकही लाईफ असते. माध्यमांच्या अतिउत्साहाच्या भरात त्यांच्या आनंदावर विर्जन पडण्याची शक्‍यता असते. यामुळे अनेक सेलिब्रिटी जोडपी देशाच्या बाहेर जाऊनच लग्न करणे पसंत करत आहेत. जरी भारतातच केले तरी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करत आहेत.

– श्वेता शिगवण

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
54 :thumbsup:
52 :heart:
0 :joy:
56 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)