“नो प्लास्टिक’बाबत विद्यार्थ्यांची जनजागृती

पिंपरी – शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असली, तरी सर्वत्र छुप्या पद्धतीने पिशव्यांची देवाण-घेवाण सुरू आहे. त्यामुळे चिखलीतील गणेश इंटर नॅशनल स्कुलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन प्लास्टिक हटाव, देश बचावचा नारा देत जनजागृती हाती घेतली.

चिखली-नेवाळेवस्ती, दापोडी आणि लिंकरोड पिंपरी या तीन शाखांमधील विद्यार्थी शहरातील सुमारे दहा हजार कुटुंबियांना प्लास्टिक वापर नकोच असा संदेश देणार आहेत. प्लास्टिक बॉटल्स, चहाचे कप आणि प्लेट ऐवजी स्टील किंवा काच, चिनीमाती आणि मातीच्या वस्तूंचा पर्याय निवडण्यास सांगणार आहेत. तसेच, दैनंदिन व्यवहारात प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी व कागदी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरणार आहेत.

बुधवारी झालेल्या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नो प्लास्टिक या इंग्रजी शब्दांची मानवी प्रतिकृती तयार केली. अनेक मुलांनी पॉलिथिन को दूर हटाओ, कागज ज्यूट को अपनाओ अशा कविता सादर केल्या. तसेच प्लास्टिक खाणाऱ्या प्राण्यांच्या व्यथा नाटकाद्वारे मांडल्या. यावेळी अध्यक्ष सतीश पाटील, सल्लागार रितू गुळवणी, मुख्याध्यापिका सोफीया इनामदार, सतीश गुळवणी, सुनील शेवाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)