“नो कॅश, “नोटा संपल्या’

हर्षद कटारिया

बिबवेवाडी – महर्षि नगर, मुकुंद नगर, बिबवेवाडी, अप्पर, सहकारनगर भागात बऱ्याच एटिएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. नोटाबंदीनंतर अद्यापही चलनतुटवड्याने सर्वसामान्य नागरिक बेजार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एटीएममध्ये खडखडाट झाला आहे. बहुतांश एटीएम सेंटर्सबाहेर “नो कॅश, “नोटा संपल्या’ असे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे पैसे असणाऱ्या एटीएमच्या शोधासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

सहकारनगरमध्ये राहण्यास ज्येष्ठ नागरिकांची मोठी पसंती असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने पेन्शनर राहतात. या भागातील जास्तीत जास्त खाती येथील राष्ट्रीयकृत बॅंकेत आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय बॅंकेची संख्या मोठी आहे. मात्र सध्या एटीममध्ये पैशाची कमतरता असून बरेच एटीएम बंद अवस्थेत आहेत. ज्येष्ठ असल्याने त्यांना घरातील घरकाम करणाऱ्या कामगारवर्गाला पगार करताना पैसे रोख स्वरूपात द्यावे लागत असल्याने ज्येंष्ठाना एटीएमवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यात एटीएम पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने त्यांची अडचण होत आहे.
सहाकारनगरमध्ये शिक्षणासाठी बाहेर गावातून आलेल्या विद्यार्थ्यांचीही मोठी संख्या आहे. या विद्यार्थ्यांनाही एटीएम बंद बसल्याची झळ बसत आहे. याबाबत विद्यार्थी प्रणव ठाकुर म्हणाला, मी मुळचा बिहार येथील राहणार असून शिक्षणासाठी पुण्यात राहत आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीममध्ये पैसे नसल्याने हाल होत आहेत. बऱ्याच जागी रोख स्वरुपात पैसे द्यावे लागतात असल्याने रोख रकमेची आवश्‍यकता असते. एटीएममध्ये पैसे नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने लवकरात लवकर एटीएम सेवा पुर्ववत करावी, असे त्याने सांगितले.
————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)