नोव्हेंबरपर्यंत चर्चेसाठी वेळ घालवला तर सगळं भस्मसात होईल

आमदार नितेश राणे यांचा इशारा

कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी राज्यभर झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलकांवर दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे सरकारने मागे घेतले नाही तर राज्यात हिंसाचार वाढेल. सरकारने नोव्हेंबरपर्यंत चर्चेसाठी वेळ घालवला तर सगळे भस्मसात होईल असा गंभीर इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

-Ads-

आमदार नितेश राणे हे विविध कार्यक्रमांसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सुरू असणाऱ्या ठिय्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली आणि मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपा सरकार वर मराठा आरक्षणाचा विषय लांबणीवर टाकल्या बद्दल टीका केली.

आमदारांनी सुरू केलेले राजीनामासत्र हे थांबवले पाहिजे. उलट राज्यभरातील सर्व आमदारांनी एकत्र येऊन विधिमंडळात मराठा आरक्षण विषयी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. राज्यभर सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आंदोलनात सहभागी आंदोलकांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावे. अन्यथा राज्यभर हिंसाचार माजेल. नोव्हेंबरपर्यंत अजून वेळ गेला तर सगळं भस्मसात होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती नाही. सरकारने जर मनात आणले तर आरक्षणाचा निर्णय एका क्षणात होऊ शकतो. मागास आयोगाचा अहवाल यायला इतका वेळ का लागतो? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. नारायण राणे यांच्या अहवालाच्या आधारे सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा अशी मागणीही त्यांनी केली.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)