नोबेल पारितोषिक विजेते व्ही. एस नायपॉल यांचे निधन 

लंडन: प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले आहे. लंडनमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार 2001मध्ये सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे इंग्रजी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल अर्थात व्ही. एस. नायपॉल यांनी 30 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले.नायपॉल यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना त्यांच्या पत्नी नादिरा म्हणाल्या, त्यांनी उभ्या आयुष्यात जे काही मिळवले ते समृद्ध करणारे आहे. ते ज्यांच्यावर प्रेम करीत होते त्यांच्यासोबत असतानाच त्यांनी आपला प्राण सोडला.
विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल यांचा जन्म त्रिनिनादमध्ये 17 ऑगस्ट 1932 रोजी झाला होता. त्यांचे वडिल सुरजप्रसाद नायपॉल हे एक भारतीय नागरी सेवांमध्ये अधिकारी होते. नायपॉल यांच्या रचनांमध्ये त्रिनिदादपासून लंडनपर्यंतचा प्रवास आणि विविध देशांतील प्रवासाचा प्रभाव जाणवतो.
त्यांनी अनेक कादंबऱ्या, वास्तवदर्शी लेख आणि प्रवास वर्णनांचे लेखन केले. इराण, इराक, पाकिस्तान, तुर्की यासारख्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये राजकीय अस्थिरतेच्या काळात भ्रमंती करून या देशांची शीतयुद्धामुळे झालेली दुर्दशा जगासमोर आणली. नायपॉल त्यांच्या इस्लामविषयक मतांमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकले. ऑक्‍सफॉर्डमधून इंग्रजीमध्ये पदवी मिळवणारे नायपॉल भारतात तीनदा आले होते. 1969 साली त्यांनी लिहिलेले “इंडिया ऍन एरिया ऑफ डार्कनेस’ यावर भारतातून प्रचंड टीकाही करण्यात आली होती.
आपल्या संपूर्ण करिअरमध्ये नायपॉल यांनी ज्या रचना केल्या त्यामुळे त्यांना 20व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले. नायपॉल यांनी लिहीलेल्या “अ बेन्ड इन दि रिव्हर’, “दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, “फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यांमध्ये विकसनशील देशांतील प्रत्येक नागिरकाचा संघर्ष पाहायला मिळतो.
नायपॉल यांच्या वंशजांना वेस्टइंडिजमध्ये भारतातून जबरदस्तीने मजुरीसाठी आणण्यात आले होते. त्यांचे वडिलही एक कादंबरीकार होते. मात्र, त्यांना योग्य संधी मिळू न शकल्याने त्यांना यात करिअर करता आले नाही. नायपॉल यांना लवकरात लवकर त्रिनिदाद सोडण्याची इच्छा होती. त्यानंतर अनेक मुलाखतीत त्यांनी आपण त्रिनिदादला आपल्या ओळखीपासून कायमच दूर ठेवल्याचे त्यांनी सांगितले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)