नोटीस मागे घ्या, अन्यथा बेमुदत संप

पुणे – फेरचनेविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या वीजकंपन्यांच्या राज्यभरातील आठ हजार कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत. ही कारवाई अन्यायकारक असून ती तत्काळ मागे घ्या, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारावा लागेल, असा इशाराही या संघटनांनी दिला आहे.

गेल्या काही वर्षांत महावितरणसह महानिर्मिती आणि महापारेषण या वीजकंपन्यांचा आर्थिक भार चांगलाच वाढला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे, हे वास्तव असतानाच अधिकारी आणि कामगारांच्या पगारावर सर्वाधिक खर्च होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वच वीजकंपन्यांची फेरचना करण्याचा निर्णय प्रशासन आणि राज्य शासनाने घेतला होता, त्याच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी दोन दिवसांचा संप पुकारला होता. या संपात सहभागी झालेल्या 8 हजार कामगारांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई करू नका, असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस कृष्णा भोयर आणि झोनल सचिव ईश्‍वर वाबळे यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)