नोटीसा काढण्याचे तहसिलदारांना आदेश?

  • वाळू, गौनखनिज उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कडक भूमिका

पुणे – जिल्ह्यात वाळू लिलाव झालेले नसताना वाळू उपसा आणि चोरटी वाहतूक सुरूच आहे. यातून महसूलला मोठा फटका बसत असल्याने माफियांवर कडक कारवाई करण्याचे धोरण महसूल विभागाने अवलंबले आहे. याशिवाय, वनविभागात तसेच नदीलगत शेतात माती, मुरूम, दगड तसेच वाळू अशा गौनखनिज साठवणुकीकरिता दिली जाणारी जागा तसेच खासगी जागेतून करण्यात आलेले रस्ते, याद्वारे अवैध धंद्यांशी संपर्क असलेल्यांना कारणे दाखवाच्या नोटीसी काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी तहसिलदारांना आदेश दिल्याचे तसेच यातून वाळू धंद्याशी संपर्क असलेल्यांवरही कारवाईचे संकेत मिळत आहेत.
पुणे जिल्ह्यातील वाळू लिलाव हरित लवादाने केलेल्या सुचंनामुळे झालेले नाहीत. पाण्याखालील वाळू उपसा केल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचे लवादाने अहवालात नमूद केले असून अशा प्रकारे वाळू उपसा करण्यास परवानगी देवू नये, अशी सूचना स्पष्ट शब्दांत मांडली आहे. त्यानंतरही जिल्ह्यातील प्रमुख नद्या, ओढे-नाले, बंधाऱ्यांतून वाळू उपसा केला जात आहे. इंदापूर, दौंड, शिरूर, हवेली आणि पुरंदरमध्ये अशा प्रकारे वाळू उपसा करण्याचे प्रमाण मोठे असल्याचेही उघड झाले आहे.
नद्यांमधून वाळू उपसा केल्यानंतर रात्रीच्या वेळी वाहतूक करण्याचा फंडा वाळू माफिया अवलंबत आहेत. त्यामुळे वाळूचे साठे करून ठेवले जात आहेत. याकरिता नदीलगत असलेली वनविभागातील जागा तसेच काठावरील शेतकऱ्यांकडून जमीन भाडेतत्वावर घेवून वापरली जात आहे. शिवाय वाळू वाहतुकीकरिता खासगी जागेतून रस्ता केल्यानंतर तेथून वाळू ट्रक नेण्याकरिता संबंधीत शेतकऱ्याला विशिष्ठ रक्कम दिली जात आहे, अशा हेतुपरस्सर किंवा अनभिज्ञपणे वाळू माफियांना मदत करणाऱ्यांनाही दोष मानून त्यांनाही कारणे दाखवाच्या नोटीसा काढून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अस आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहलिसदारांना दिले आहेत.
इंदापुरात मोठ्या प्रमाणात वाळू इंडस्ट्री फोफावली आहे. नीरा आणि भिमेतून वाळू उपसा सुरूच आहे. तर, दौंड तालुक्‍यालगत नगर जिल्हा येत असल्याने भिमेच्या काठांवरील गावांतून हा धंदा फोफावला आहे. शिरूरमध्ये सध्या या धंद्याला मोठा जोर असून शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय मंडळींचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. तसेच पूर्व हवेलीचा बराचसा भाग मुळा मुठा नदी व भीमा नदीलगत असल्याने वाळू उपशासह येथे माती, मुरूम, दगड अशा अन्य गौण खनिज उत्खननाचे प्रमाणही मोठे आहे. अष्टापूर, बिवरी, वाडेगाव हा भाग भीमा नदी व मुळामुठा नदीलगत दौंड तालुक्‍याच्या सीमा रेषेपर्यंत पसरला असल्याने येथे गौणखनिजाचा काळा धंदा जोरात आहे. विशेष, म्हणजे अशा कामाकरिता वनविभाग तसेच खासगी शेतकऱ्यांच्या जागेचा वापर होत आहे.

  • शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार?
    गौनखनीज उत्खनन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना कारणे दाखवा नोटीसी पाठविण्याचे आदेश दिले असले तरी अशा काही अवैध प्रकरणात शासकीय अधिकारी, कर्मऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत चौकशी कोण करणार? कारवाई कोण करणार? हे कात्र या आदेशात कोठेच स्पष्ट करण्यात आलेले नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)