नोटाबंदी : संशयित आर्थिक व्यवहारांतून दहशतवादाला मदत

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर समोर आलेल्या अहवालातून काही प्रमुख बाबी उघड होत आहेत. यात संशयित आर्थिक व्यवहारांतून दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (एफआययू) यांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे, संशयित आर्थिक व्यवहारांतून देशभरात मोठी उलाढाल झाली आहे. यात एकट्या २०१६-१७ या वर्षांत अशा संशयित आर्थिक व्यवहारांचे तब्बल ४ लाख ७३ हजार ६ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. ही संख्या २०१५-१६ च्या तुलनेत तब्बल चौपट अधिक आहे. दरम्यान, या अहवालाबाबत सरकारकडून आणखी काही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)