नोटाबंदीवरून नरेंद्र मोदींनी माफी मागावी

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या मुद्‌द्‌यावर देशाशी खोटे बोलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी आज कॉंग्रेसने केली. आरबीआयचा अहवाल जारी झाल्यानंतर इतर विरोधी पक्षांनीही नोटाबंदीवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

खोटेपणाबद्दल आता मोदी माफी मागणार का, असा सवाल कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी केला. नोटाबंदी म्हणजे मोदीनिर्मित आपत्ती होती हे आरबीआयच्या अहवालामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले. तर नोटाबंदीच्या निर्णयावर सुरूवातीपासून आक्षेप घेणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

काळा पैसा कुठे गेला? काळा पैसा बाळगणाऱ्यांना तो पांढरा करता यावा यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली का, अशी विचारणा त्यांनी केली. नोटाबंदीमुळे देशातील जनतेला मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या. आता नोटाबंदीतून नेमके काय साध्य झाले ते स्पष्ट करण्यासाठी मोदी सरकारने श्‍वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)