नोटाबंदी म्हणजे भ्रष्टाचारावर इलाज करण्यासाठीचे कडू औषध 

पंतप्रधान मोदी: दिल्लीत चार पिढ्यांनंतर राजघराण्याची सत्ता संपुष्टात येण्याचा इतिहास 
झाबुआ  – नोटाबंदीवरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला बिल्कूल न बधता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. वाळवीचे निर्मूलन करण्यासाठी आपण विषारी औषधाचा वापर करतो. त्याचप्रमाणे देशातील भ्रष्टाचारावर इलाज करण्यासाठी मी नोटाबंदीचा कडू औषध म्हणून वापर केला, असे त्यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मध्यप्रदेशातील भाजपच्या प्रचार सभांमध्ये मोदी बोलत होते. बॅंकिंग व्यवस्थेमध्ये पैसे परत आणण्यासाठी नोटाबंदी लागू करण्यात आली. जे लोक घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये, बिधान्यांमध्ये पैसे दडवायचे; ते आता प्रत्येक पैशाचा कर भर आहेत. त्या पैशांचा वापर आम्ही जनहिताच्या योजनांसाठी वापरत आहोत, असे ते म्हणाले.

जे काम आम्ही चार वर्षांत केले; ते करण्यासाठी कॉंग्रेसला दहा वर्षे लागली असती. कितीही मोठे राजघराणे असले तरी त्याची सत्ता दिल्लीत चार पिढ्यांनंतर संपुष्टात आली, असे इतिहास सांगतो. कॉंग्रेसही तसेच होईल, असे म्हणत त्यांनी नेहरू-गांधी परिवारावर निशाणा साधला. मध्यप्रदेशात कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
3 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)