नोटाबंदी इफेक्ट : संशयित बँक खात्यांबद्दल समोर आली महत्वाची आकडेवारी

नवी दिल्ली : सन २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक जाहीर केलेल्या नोटाबंदीचे काय परिणाम झाले, हे आणखी स्पष्ट झालेले नव्हते. मात्र, याबद्दलची महत्वाची माहिती आता समोर येणे सुरू झाले आहे.

एका रिपोर्टनुसार, नोटाबंदीनंतर आतापर्यंत देशात सर्वाधिक प्रमाणात बनावट चलन ताब्यात घेण्यात आले आहे. तर संशयित खात्यांतून झालेल्या व्यवहारात तब्बल ४८० टक्के वाढ झाली आहे. या खात्यांबद्दल तयार करण्यात आलेल्या शासकीय अहवालात या बाबी मांडण्यात आल्या आहेत.

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट (एफआययू) यांनी तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे, की खासगी, शासकीय आणि सहकारी क्षेत्रांसह सर्व बँका आणि अन्य आर्थिक संस्थांमध्ये २०१६-१७ दरम्यान तब्बल ४०० टक्के पेक्षा अधिक प्रमाणात संशयित व्यवहार आढळून आले आहेत. यांची संख्या ४.७३ लाखाहून अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)