नोटाबंदीनंतर 1000 रुपयाच्या 8.9 कोटी नोटा जमा नाहीत – आरबीआय अहवाल

 नोटा छपाईच्या खर्चात दुपटीने वाढ

मुंबई – नोटाबंदीननंतर 1000 रुपयांच्या एकूण 632.6 कोटी जुन्या नोटांपैकी 1.4 टक्के म्हणजे 8.9 कोटी नोटा अद्यापपर्यंत जमा झालेल्या नाहीत, अशी माहिती आज आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात दिली आहे. तसेच 2016-17 या आर्थिक वर्षात 7.63 लाख, तर 2015-16मध्ये 6.32 लाख नकली नोटा जप्त करण्यात आल्या असल्याचे नमूद केले आहे.

भारतीय रिझर्व बॅंकेने (आरबीआय) बुधवारी वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी मागील वर्षी 8 नोव्हेंबर रोजी लागू केलेल्या नोटाबंदीदरम्यान चलनातील 15.44 लाख कोटी रुपयांच्या प्रतिबंधीत नोटांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बॅंकेत जमा झाले असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैसा बाहेर काढण्यासाठी 8 नोव्हेंबरपासून चलनातील 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्यानंतर सरकारने 2000 रुपयांची नवीन नोट प्रसिद्ध केली. तसेच काही दिवसानंतर 500 रुपयाची नवीन नोट चलनात आणल्या. परंतु 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या.

आरबीआयच्या अहवालानुसार सध्या 2000 रुपयांच्या 3385 दशलक्ष, तर 500 रुपयांच्या 5882 नोटा चलनात आहे. या नोटांचे एकूण मुल्य 9512 बिलियन रुपये इतके आहे. आर्थिक वर्ष 2016मध्ये रिझर्व बॅंकेने नोटा छपाईवर 3,421 कोटी रुपये खर्च केले होते. तर नोटाबंदीनंतर आर्थिक वर्ष 2017मध्ये हा खर्च वाढून 7,965 कोटी रुपये ऐवढा झाला असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)