नोटाबंदीनंतर जन-धन खात्यांमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा

माहिती अधिकारातून बाब उघड

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर जन-धन खात्यात आतापर्यंत 64 हजार 564 कोटी रुपये जमा झाले असल्याचे समोर आले आहे. ऐवढेच नाही तर यातील 300 कोटी रुपये हे नोटाबंदीनंतर सात महिन्यातील असल्याची धक्कादायक माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी योजनांमधील ‘जन-धन’ ही देखील एक आहे. याचा मुख्य उद्देश बँकिंग सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा आहे. पण नोटाबंदीनंतरच्या काळात जन-धन खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 14 जून 2017 पर्यंत 28 लाख 90 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली. यातील सरकारी बँकांमधील खात्यात 23 लाख 27 कोटी रुपये जमा झाले. तर स्थानिक ग्रामीण बँकांमध्ये 4 लाख 70 कोटी रुपये, आणि 92 लाख 70 कोटी रुपये खासगी बँकांमध्ये, असे एकूण म्हणजेच, 64 हजार 564 कोटी रुपये जमा झाले.तर 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत देशभरात 25 लाख 58 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली. ज्यात एकूण 64 हजार 252 कोटी रुपये जमा असल्याचे अर्थराज्य मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना सांगितले आहे.

म्हणजेच, 16 नोव्हेंबर 2016 ते 14 जून 2017 पर्यंत जन-धन खात्यांवर एकूण 311.93 कोटी रुपये जमा करण्यात आले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. याच काळात सर्वाधिक 300 कोटी रुपये जन-धन खात्यात जमा झाल्याचे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)