नोटाबंदीच्या संकटातून सावरण्यासाठी इंधनावर भरमसाठ कर लावण्याचा प्रयत्न !- राज ठाकरे

मुंबई:  इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसच्या भारत बंदमध्ये आरजेडी आणि डीएमके सुध्दा सामील होणार आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील ‘भारत बंद’ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा आणि सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

विविध शहरातील इंधनाचे दर

मुंबई : पेट्रोल (87.89), डिझेल (77.09)
चेन्नई : पेट्रोल (83.66), डिझेल (76.75)
कोलकत्ता : पेट्रोल (83.39), डिझेल (75.46)
पुणे : पेट्रोल (87.75), डिझेल (75.76)

इंधनाचे दर जागतिक बाजारपेठेशी सलंग्न असले तरी त्यावर केंद्र आणि राज्यांनी अव्वाच्या सव्वा पद्धतीने कर लादले आहेत. एखाद्याला आलेला झटका हे देशाचं धोरण होऊ शकत नाही. नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आली. ती सावरायला इंधनावर भरमसाठ कर लादून आर्थिक डोलारा सावरायचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांची किंमत सामान्य माणसाने का मोजायची ?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)