नोटाबंदीचा परिणाम मंदावल्याने नोकरभरती वाढली 

नवी दिल्ली: नोटाबंदी आणि जीएसटीचा परिणाम आता मंदावला असून रोजगारनिर्मिती आणि नोकरभरतीत बऱ्यापैकी वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ऑक्‍टोबरमध्ये भारतातील नोकरभरती आधीच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 21 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. ऑक्‍टोबरचा नोकऱ्यांसंदर्भातील जॉबस्पीक निर्देशांक 2,088 अंकांवर पोहोचला.

मागील वर्षी याच काळात तो 1,728 अंकांवर होता. नोकरी डॉट कॉमने केलेल्या सर्वेक्षणानुसार, यंदाच्या ऑक्‍टोबरमध्ये आयटी क्षेत्रात सर्वाधिक नोकरभरती पाहायला मिळाली. अमेरिकेने व्हिसावर लादलेल्या बंधनामुळे आयटी क्षेत्रात पीछेहाट झालेली होती. परंतु, मागील दोन महिन्यांपासून या क्षेत्राने पुन्हा एकदा झेप घेतली असून, त्याचा फायदा नोकरभरतीला झाला आहे. आगामी काही महिन्यांत ही गती कायम राहण्याची शक्‍यता आहे. आयटी क्षेत्रातील रोजगार वृद्धीला स्टार्टअप कंपन्यांनीही हातभार लावला आहे. रोबोटिक्‍स, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन इत्यादी क्षेत्रांत स्टार्टअप कंपन्यांनी चांगले काम केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)