नोटाटंचाईच्या काळात पेटीएमचा वापर वाढला

   पैसे हस्तांतरण आणि क्‍यूआर आधारित पेमेंटमध्ये 30% वाढ

मुंबई -वन 97 कम्युनिकेशन्सच्या मालकीच्या पेमेंट गेटवे पेटीएमने गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात भारतातील विविध शहरांमधील व्यवहारांत 30% वाढीची नोंद केली आहे. ही वाढ प्रामुख्याने आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगण आदी भागांमध्ये दिसून आली आहे.

-Ads-

नोटाटंचाईमुळे नागरिक किराणा स्टोअर्स, पेट्रोल पंप्स, फार्मसीज, ऑटो तसेच टॅक्‍सीचे भाडे आदींचे पेमेंट करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर पेटीएम क्‍यूआरचा वापर करत आहेत ज्यामुळे पेटीएमच्या दैनंदिन व्यवहारांत वाढ दिसून आली आहे. चलनटंचाईच्या या कठीण काळात बॅंकेत तसेच पेटीएम खात्यांमध्ये मपैसे हस्तांतरण करण्याकरिता पेटीएम ऍप सक्रियपणे वापर करण्यात आला आहे. कंपनीने उपभोक्ते आणि व्यापाऱ्यांना त्यांचे दैनंदिन जीवन सुलभतेने चालू ठेवण्यात मदत करण्यासाठी आपले व्यापारी संपादन प्रयत्न देखील वाढवले आहेत.

पेटीएमचे सीओओ किरण वासिरेड्डी यांनी सांगितले की, देशातील विविध भागांत निर्माण झालेल्या नोटाटंचाईसमयी ग्राहक आमच्या सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत ज्यामुळे पैसे हस्तांतरण आणि क्‍यूआर आधारित पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. नोटाटंचाईच्या या काळात ग्राहकांचे जीवन सुरळीत चालावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पेटीएम ऍपवर दैनंदिन व्यवहारांशी निगडित विविध सेवा आधीपासूनच उपलब्ध असून यापुढेही ग्राहकांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने नवनवीन उपयोगी सेवा जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.डिजिटल व्यवहार करणे सोपे झाल्यास सर्वसामान्य नागरिकांकडून असे व्यवहार वाढतील त्यामुळे हे व्यवहार सोपे करण्याचा प्रयत्न कंपन्या करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)