जनधन योजना व नोटाबंदीमुळे 80 टक्‍के लोकांची बॅंकांत खाती 
मुंबई – नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटल व्यवहारांना चालना दिली आहे. मात्र तरीही नोटांच्या मागणीत 7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे दिसून येते. रिझर्व्ह बॅंकेने याबाबत जारी केलेल्या माहीतीनुसार नोव्हेंबर 2018 नंतर नोटाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेबर 2016 मध्ये चलनात 17 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. मात्र यानंतर आता त्यात 7 टक्‍के वाढ होऊन चलनातील नोटाचे प्रमाण 19.25 लाख कोटी नोटावर गेले आहे. गेल्या चार वर्षात सरकारने सर्व समावेशक विकासासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यासाठी सरकारने जनधन योजना सुरू केली होती.

त्यानंतर सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावर बरीच टिका होऊनही सरकारने नोटाबंदीचे समर्थन केले होते. त्याचे काही चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. सध्या देशातील 80 टक्के लोकांचे बॅंकेत खाते आहे.
जरी देशातील 90 लोकाचे बॅंकेत खाते असले तरी गेल्या चार वर्षात त्यातील 38 टक्के इतकी खाती काळाच्या ओघात फारशी चालत नसल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर जनधन योजनेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत 3 कोटी 10 लाख खाती उघडण्यात आली. आता त्या खात्यातील ठेवीची रक्कम 812 अब्ज रुपयावर गेली आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये देशातील सर्व बॅंकांतील ठेवीची रक्कम 21.8 लाख कोटी रुपये होती. आता त्यात 24 टक्‍के वाढ होऊन ती 27.2 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. या काळात बॅंकांनी 97 लाख इतकी क्रेडिट कार्ड, तर 1 कोटी 30 लाख इतकी डेबीट कार्ड वितरीत केली आहेत. त्यामुळे आता देशता वितरीत करण्यात आलेल्या क्रेडिट कार्डची संख्या 3 कोटी 75 लाख तर डेबिट कार्डची संख्या 8 कोटी 61 लाख झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)