नोटबंदी हा राजकीय नव्हे, नैतिक निर्णय : अरूण जेटली 

भोपाळ: केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय हा राजकीय स्वरूपाचा निर्णय नव्हता तर तो अत्यंतिक नैतिक निर्णय होता असे केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. विविध राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे त्यातही सध्या नोटबंदीचा विषय गाजतो आहे.

नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका कालच राहुल गांधी यांनी केली होती. तर या निर्णयाचे समर्थन करीत नोटबंदीतून बाहेर आलेला काळापैसा जनतेच्या कल्याणासाठीच वापरणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले होते. आज अरूण जेटली हे मध्यप्रदेश भाजपच्या निवडणूक जाहीरनामा प्रकाशन सोहोळ्यासाठी भोपाळ मध्ये आले होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नोटबंदीच्या विषयावर बोलते करण्याचा प्रयत्न केला त्यावर जेटली यांनी हा राजकीय निर्णय नव्हता तर नैतिक निर्णय होता, एवढीच प्रतिक्रीया दिली. यावर अधिक भाष्य करणे मात्र त्यांनी टाळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)