‘नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार ; जिल्हा बँकांमध्ये अजूनही पैसे पडून’

कोल्हापूर: राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा आज पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाली. परिवर्तन यात्रेची पहिली सभा कोल्हापूरमधील कागल येथे झाली या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारवर सडकून टीका केली. लाखोंचा पोशिंदा सुखी नाही, आया-बहिणी सुरक्षित नाहीत, कुपोषणाने डोके वर काढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सगळ्याला कारणीभूत असलेले हे सरकार दळभद्री असून याला उलथवून टाका, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कागलच्या सभेत केली.

नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. जिल्हा बँकांमध्ये अजूनही पैसे पडून आहेत. मात्र सरकार त्या नोटा बदलून देत नाही. मोदी ज्याचं काम त्याला करू देत नाहीत. नोटबंदी जाहीर करण्याचे काम हे रिझर्व्ह बँकेचे होते. पण मोदींना सर्व ठिकाणी क्रेडिट घ्यायचे आहे, म्हणूनच नोटबंदीचा निर्णय मोदींनी जाहीर केल्याचा आरोपही अजितदादांनी केला. प्रियंका गांधी राजकारणात आल्या तर भाजपने त्यांच्यावर टीका केली. भाजप महिलांचा मान राखत नाही. यांच्या घरी आया-बहिणी नाहीत का ?, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

-Ads-

पश्चिम महाराष्ट्रात या दळभद्री सरकारने विजेचे एकही कनेक्शन पाच वर्षांत दिले नाही, सर्वात मोठा अन्याय पश्चिम महाराष्ट्रावर झाला आहे. त्यामुळे पक्षाचे खासदार मोठ्या संख्येने निवडून द्या, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

कागलकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नेतृत्वावर प्रचंड प्रेम आहे. असे प्रेम जर मिळाले तर जगात कोणतीही गोष्ट आपल्याला पराभूत करू शकत नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. याआधीही काँग्रेसव्यतिरिक्त दुसरे सरकार आले होते, पण या सरकारचा काळच वेगळा आहे. देशातील स्वतंत्र संस्था मोडीत काढण्याचे काम मोदी सरकार करते आहे. प्लॅनिंग कमिशन बरखास्त केले, म्हणूनच यांना बुलेट ट्रेन आणण्याचा निर्णय घेता आला, असा आरोपही पाटील यांनी केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)