नोटबंदीनंतर डिजीटल व्यवहारात झाली 23 टक्के वाढ

नवी दिल्ली – देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारात सर्वाधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे. ही वाढ युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात केवळ 7 टक्के तर एकूण डिजिटल व्यवहारात 23 टक्के वाढ झाली असल्याचे एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने संसदीय समितीला ही माहिती दिली आहे.

नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्थेत डिजिटल अर्थव्यवस्थेत काय काय बदल झाले आहेत? हा प्रश्‍न विचारल्यानंतर संसदेच्या अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर काही अधिकाऱ्यांनी आपले अहवाल सादर केले त्यात ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार नोटाबंदीच्या पूर्वी या व्यवहारांची संख्या 1.2 मिलियन होती. ती आता 2.2 मिलियन झाली आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात मात्र केवळ 7 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये हे व्यवहार 6.8 मिलियनचे होते. मे 2017 मध्ये प्लास्टिक कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार 7.3 मिलियन एवढे झाले. नोव्हेंबर2016 मध्ये हे व्यवहार 22.4 मिलियन होते. मे 2017 मध्ये ते 27.5 मिलियन झाले आहेत. युपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात सर्वाधिक वाढ झाली आहे. नोव्हेंबर2016 मध्ये ही वाढ प्रति दिवस एक मिलियन एवढी होती. मे 2017 मध्ये ही वाढ 30 मिलियन एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)