नोटबंदीच्या निषेधार्थ “लुटारूंचा दिवस’ आंदोलन

पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केलेल्या नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “लुटारूंचा दिवस’ आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी नोटाबंदी जाहीर केली. त्यामुळे काळा पैसा जमा करता येईल, दहशतवादी कारवाया बंद होतील, तसेच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील असे सांगत देशासाठी थोडा त्याग करा, असे आवाहन मोदींनी केले. देशासाठी सर्वसामान्य जनतेने शारीरिक, आर्थिक झळ सोसून; तर शेकडो नागरिकांनी जीव गमावला. मात्र, नोटाबंदीविरोधात आवाज उठविला नाही. आज दोन वर्षांनंतर हा निर्णय आत्मघाती व देशातील करोडो जनतेवर टाकलेला दरोडा होता असे दिसते. कारण ज्या कारणासाठी नोटाबंदी केली त्या एकाही प्रश्नाची सोडवणूक झाली नाही. उलट ऐन शेती हंगामात नोटाबंदी करून शेतकऱ्यांच्या आलेल्या मालाला भाव मिळाला नाही. कमी दरात त्यांना माल विकावा लागला. पैसे लवकर मिळाले नाहीत. छोट्या उद्योगधंद्यांवर फार वाईट परिणाम होऊन बेरोजगारी वाढली. कंपन्यांनी कामगार कपात केली. विदेशी गुंतवणूकदार भारतात आले नाहीत, असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने सरकारचा निषेध केला.

सुनील गायकवाड, रहीम सय्यद, राहुल इनकर, सुहास देशमुख, के. डी. वाघमारे, राजेश बारसागडे, भारत कुंभारे, अमीर खां, आदिनाथ सकट, राजू ससाणे, महादेव कावळे, बबन साळवे, कैलास लोखंडे, धनंजय कांबळे, बलभीम रोकडे, राजेंद्र पगारे, हरिश्‍चंद्र तोडकर, अमिर खान, समीर खान, जितेंद्र चौधरी, सुनील खिलारे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)