नोटबंदीची दोन वर्ष : विरोधकांची भाजपवर टीका 

नवी दिल्ली – नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने विरोधकांनी मोदी सरकारवर ट्विटरवरून हल्ला चढविला आहे. काँग्रेसने #NotebandiKiDoosriBarsi चा वापर करत देशातील जनतेला काय गमवावे लागले याचा पाढाच वाचून दाखविला आहे. नोटबंदीने ३.५ कोटी लोकांचे रॊजगार संपुष्टात आले, १०५ जणांना जीवास मुकावे लागले, १.५ टक्के जीडीपीचे नुकसान झाले, आठ हजार कोटी नव्या नोटांच्या छपाईसाठी खर्च झाले, असे ट्विट काँग्रेसने केले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काळा दिवस म्हणत निषेध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करताना याद्वारे बनावट नोटा, काळा पैसा, टेरर फंडिंग याला पायबंद बसणार असल्याचे सांगितले होते. परंतु, यावर काँग्रेसने आणखी एक ट्विट करत टीका केली आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हंटले कि, काळा पैशाला लगाम बसला नाही, टेरर फंडिंगही चालूच आहे. नोटबंदीचे सत्य जनतेला माहित आहे.

तर भाजपनेही काँग्रेसला ट्विरवरून प्रत्युत्तर दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)