नोकिया पुन्हा बाजारपेठेत सक्रिय

नवी दिल्ली: एचएमडी ग्लोबल या नोकिया फोनच्या निर्मात्यांनी नोकिया अँड्रॉइड स्मार्टफोनचे नूतनीकरण करत नोकिया 5.1, नोकिया 3.1 आणि नोकिया 2.1 सादर करण्याची घोषणा केली आहे. कंपनी भारतात फिचर फोनमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. मात्र नंतर ही कंपनी स्मार्ट फोन आल्यावर मागे पडली. नोकिया 5.1 मध्ये 5.5 इंच डिस्प्ले पूर्ण एचडीसह आहे.

नोकिया 5.1 हा 2.0 गीगाहर्टज मीडियाटेक हेलीओ पी 18 ऑक्‍टो-कोर प्रोसेसर द्वारा संचालित आहे. नवीन नोकिया 3.1 मध्ये 3 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन आरएएम पर्यायासह प्रस्तुत केले आहे. या स्मार्टफोनचा 5.2 इंच एचडी डिस्पले आहे. नोकिया 3.1 मीडियाटेक 6750 ऑक्‍टा-कोर चिपसेट, वर चालते. हे सर्व स्मार्टफोन 12 ऑगस्ट 2018 पासून भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होतील असे कंपनीकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)