नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75% रक्‍कम काढण्याची सुविधा

नवी दिल्ली – नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75टक्‍के रक्‍कम काढण्याची सुविधा देण्याचा निर्णय सेवानिवृत्ती निधी संस्थेने (ईपीएफओ) जाहीर केला आहे. आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील 75 टक्के रक्कम काढून घेतल्यानंतर उर्वरित 25 टक्के रकमेसह आपले प्रॉव्हिडंट फंड खाते चालू ठेवण्याची सवलतही खातेदाराला देण्यात आलेली आहे.

ईपीएफएस (एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड स्कीम) 1952 मधील नवीन तरतुदींनुसार नोकरी सुटल्यानंतर दोन महिन्यांनी बाकी 25 टक्के रक्कम काढून खाते बंद करण्याचा पर्यायही खातेदाराला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
नोकरी सुटल्यानंतर एका महिन्याने आपल्या खात्यातील 75 टक्के रकमेचा ऍडव्हान्स घेण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एपीएफओच्या ट्रस्टींच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. गंगवार ट्रस्टी केंद्रीय बोर्डाचे अध्यक्षही आहेत.
सध्या नोकरी सुटल्यानंतर दोन महिन्यांनी आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील संपूर्ण रक्कम काढून खातेदाराला खाते बंद करता येते. बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेवरील जवळपास सर्वच ठराव मंजूर केल्याचेही गंगवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)