नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 8 लाखाची फसवणूक

पुणे,दि.12- सिंगापूरला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तसेच दरमहा चांगले उत्पन्न मिळविण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली. या तरुणाकडून ऑन लाईन पध्दतीने 8 लाख 19 हजार 500 रुपये घेण्यात आले होते. यानंतरही त्याला नोकरी न दिल्याने त्याने सायबर सेलकडे फसवणूकीची तक्रार दाखल केली होती. त्यावरुन कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात बॅंक धारक व मोबाईल धारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नरेश नायडु(32,रा.कोंढवा खुर्द) यांना एका व्यक्तीने मोबाईलवर कॉल करुन सिंगापूर येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. तसेच दरमहा चांगले उत्पन्न मिळवून देण्याचेही सांगितले होते. त्याच्यावर विश्‍वा ठेऊन फिर्यादीने नोकरीसाठी त्याच्या अकाऊंटवर वेळावेळी त्याने सांगितल्याप्रमाणे 8 लाख 19 हजार 500 रुपयांची रक्कम वर्ग केली. 14 डिसेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 दरम्यान त्याने हे पैसे वर्ग केले होते. मात्र यानंतर संबंधीत व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क टाळून त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी दिली नाही. यामुळे फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर फिर्यादीने तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)